अमोल जगताप मित्रमंडळाच्यावतीने १०१ कुटुंबांना कीट वाटप

Foto
उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांनी वाढदिवसाच्या खर्च न करता एक हात मदतीचा उपक्रम

गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून गंगापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप मित्र मंडळाच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत एक हात मदतीचा हा मुख्य विचार केंद्रस्थानी ठेवून विविध गरजू घटकांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम गोशाळेतील गोमातांसाठी मोफत चारा वाटप करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करण्यात आली व त्यांना फळे तसेच बिस्किटांचे वाटप करून मदतीचा आधार देण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला गंगापूर संगणक प्रयोगशाळेकरिता खुर्च्छा भेट देण्यात आल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उत्तम सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच शहरातील अरबी मदरशातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वह्या व पेन वाटप यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०१ गरीब व गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. 

अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि गोमातांची सेवा करत अमोल जगताप यांनी समाजाप्रती असलेली आपली तीव्र बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अमोल जगताप यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचे व उपक्रमाचे गंगापूर तालुक्यात कौतुक होत आहे.